History
- १९३६
माटुंगा पोलीस ठाणे
माटुंगा पोलीस ठाण्याची स्थापना १९३६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - माटुंगा पोलिस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, किंग सर्कल स्टेशनजवळ, माटुंगा पूर्व, मुंबई - ४०००१९ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५,००,००० लोकसंख्या ३.५ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - स्वामी नारायण मंदिर बिट पोलीस चौकी, माटुंगा स्टेशन पूर्व पोलीस चौकी, पाच उद्यान पोलीस चौकी, गवारे गाव पोलीस चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्वामी नारायण मंदिर, दादर पोस्ट ऑफिस, दादर बेस्ट वर्कशॉप, फुटका टॅक चा समावेश होतो. इक्वार्थ लेप्रसी हॉस्पिटल, इक्वार्थ एड्स हॉस्पिटल हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, परिसरात लाड क्लिनिक, माटुंगा क्लिनिक आणि रुग्णालय, मानव कल्याण ट्रस्ट, आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय, डॉ. सुधीर जोशी रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी दादर रेल्वे स्टेशन, माटुंगा रेल्वे स्टेशन, किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन, शिवनेरी बस स्टॉप हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. माटुंगा पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २४०१४७३२
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२२७