History
- १९१८
एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाणे
एम.आर.ए. मार्ग पोलीस स्टेशन (पूर्वी फलटण रोड पोलीस स्टेशन) १९१८ मध्ये स्थापन झाले आणि ते हज हाऊस जवळ, छत्रपती शिवाजी टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र ४००००१ या पत्त्यावर स्थित आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण जनसंख्या २.५ लाख लोकसंख्या ही २.५ चौ.कि.मी. मध्ये स्तिथ आहे. हे पोलीस स्टेशन ४ बीट चौक्यांमध्ये विभागले गेले आहे - बाबुराव शेट्टे पोलीस चौकी, फोर्ट हाऊस पोलीस चौकी, हुतात्मा चौक पोलीस चौकी आणि फोर्ट मार्केट जंक्शन पोलीस चौकी.
मुंबई स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (टकसाळ), मुंबई जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, जनरल पोस्ट ऑफिस, इस्रायली लोकांचे प्रार्थनास्थळ (यहूदी मंदिर), सीएसएमटी रेल्वे स्टेशन, परदेशी वाणिज्य दूतावास कार्यालये आणि शाळा यासह प्रमुख कंपन्यांची प्रशासकीय कार्यालये; माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणेच्या हद्दीत स्तिथ आहे. विशेषतः, या पोलीस स्टेशन परिसरात भारतीय आणि परदेशी प्रमुख बँका आहेत. दक्षिण मुंबईतील घाऊक आणि किरकोळ विक्रीसह लोकप्रिय बाजारपेठ म्हणजे मनीष मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केट (महात्मा फुले मंडई). हे या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहेत, जिथे लोक मोठ्या संख्येने येतात. प्रसिद्ध सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि या अंतर्गत असलेले सेंट जॉर्ज सरकारी दंत महाविद्यालय हे या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्वात प्रसिद्ध सरकारी रुग्णालये/महाविद्यालये आहेत.
सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि बस डेपोद्वारे या परिसरात कनेक्टिव्हिटीची सोय केली जाते. एम.आर.ए. मार्ग पोलिस स्टेशन परिसरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी वचनबद्ध आहे आणि सर्व नागरिकांना कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२६२०७५९
मोबाइल क्रमांक - ८९७६९४७१७९