×

History


-

कुर्ला पोलीस ठाणे,

स्वदेशी मिल, स्वान मिल यांचे कामगार, स्थानिक इस्ट इंडीयन ख्रिश्चन, स्थलांतरीत उत्तर भारतीय यांच्यातील वाद या पार्श्वभूमीवर सन १९४० मध्ये कुर्ला पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. पूर्वेस मध्य रेल्वेचा ट्रॅक, पश्चिमेस मिठी नदीचा किनारा, दक्षिणेस एल.बी.एस. रोडवरील महाराष्ट्र वजन काटयापासुन ते उत्तरेस कुर्ला पाईप रोड मस्जिद ते बौध्द कॉलनी व एल.बी.एस. मार्गावरील कल्पना सिनेमापर्यंतचा भाग अशी हद्द आहे. तसेच दक्षिणोत्तर ३.१ कि.मी., पूर्व-पश्चिम १.५ कि.मी. असा विस्तार, क्षेत्रफळ सुमारे ४.६५ चौ.कि.मी. आहे.

सन १९८४, सन १९९२-९३ मध्ये जातीय दंगलींची पार्श्वभूमी असल्यामुळे जातीय दृष्टया संवेदनशिल परिसर मानला जातो. सिमीसारख्या संघटनेचे कार्यालय पूर्वी फितवाला कंपाऊंड, पाईप रोड येथे कार्यरत होते. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडी मशिद, सर्वेश्वर मंदीर, जामा मशिद, गफुर खान इस्टेट, कपाडीया नगर, अहलेहदीस-फितवाली मशिद, पाईप रोड ही जातीय दृष्टया संवेदनशील ठिकाणे आहेत.

केंद्रीय श्रमिक भवन संस्था, महानगर दंडाधिकाऱ्यांची ०९ न्यायालये, १० राष्ट्रीयीकृत बॅंका, ०२ पोस्ट ऑफिस, ०२ चित्रपटगृहे, ०१ बस डेपो, कनाकीया बिजनेस पार्क, इक्वीनौक्स बिजनेस पार्क, कुर्ला रेल्वे स्टेशन, २० शाळा, ०१ आश्रम शाळा, ०१ लेडीज होस्टेल, ०१ पंपींग स्टेशन, ०३ पेट्रोल पंप, ०१ सी.एन.जी. गॅस, महानगर पालिकेचे 'एल' वार्ड कार्यालय, ०१ मनपा अशी शासकीय/निमशासकीय कार्यालये व आस्थापना आहेत.

न्यू मिल रोड ही गजबजलेली बाजार पेठ, कुर्ला हे मध्य व हार्बर रेल्वेवरील गर्दीचे लोकल स्थानक व बीकेसी परिसरातील कार्यालयात सकाळ-सायंकाळ ये-जा करणारी मोठी गर्दी व तिचे व्यवस्थापन इत्यादी आव्हाने आहेत. सदर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ४ बिट आहेत.