×

History


-

गोवंडी पोलीस ठाणे

गोवंडी पोलिस स्टेशनची स्थापना १० ऑक्टोबर २०११ रोजी झाली- शासन निर्णय क्र.अेपीआ/३१०९/८३६/प्र.क्र./३४०/पोल-३, दिनांक ३१/१२/२००९ नुसार गोवंडी पोलीस ठाणेस मंजूरी देण्यात आलेली आहे. चेंबूर पोलीस ठाणे आणि ट्रोम्बे पोलीस ठाणे हद्दीत वाढत असलेली लोकसंख्या, ट्रोम्बे व लगतच्या परिसरात असलेली मर्मस्थळे आणि त्यांना असलेला संभाव्य धोका व इतर संबंधित बाबींच्या अनुषंगाने गोवंडी पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले.

नवनिर्मित गोवंडी पोलीस ठाणेची स्थलसिमा ठरविताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रोम्बे पोलीस ठाणे, मुंबई यांचे संमतीने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरविण्यात आलेली आहे. सदरचा प्रस्ताव सादर करताना स्थानिक रहिवाशी यांना तक्रार नोंदविण्यास अडचणी निर्माण होणार नाही व नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा प्राप्त करुन देता येईल यावर भर देण्यात आलेला होता.