×

History


-

दहिसर पोलीस ठाणे

मुंबई मध्ये रोजगार व सुरक्षितता उपलब्ध असल्याने व दहिसर भागात स्वस्त जमिनी व घरे उपलब्ध असल्याने बघता बघता दहिसर ची लोकसंख्या वाढू लागली तसेच दहिसर हे मुंबईचे टोक असल्याने गुजराती बांधवांना पश्चिमद्रुतगती महामार्गाने गुजरातकडे जाता येत असल्याने तसेच दहिसरमध्ये जकातनाका असल्याने दुसर्या राज्यातून उत्पादित मालाची बाजारपेठेत अथवा मुंबई बाहेर दळणवळण करण्याची उत्तम सोय असल्याने तसेच लघुउद्योगास परवडू शकतील अशा स्वत किमतीत जागा उपलब्ध असल्याने परिसरामध्ये जास्त स्मॉलस्केल इंडस्ट्रीज निर्माण झाल्या. पर्यायाने बहुसंख्य लघुउद्योजक हे दहिसरवासी झाले व दहिसरचा झपाटयाने विकास झाला. पूर्वी सदर पोलीस ठाणे हे बोरीवली पोलीस ठाणेचे अखत्यारीतील ‘‘दहिसर सब पोलीस ठाणे’’ या नावाने प्रचलित होते. पोलीस ठाणे हद्दीतील वाढती लोकसंख्या, गुन्हयाचे वाढते प्रमाण व पोलीस ठाण्याचा असलेला २५ चौ.कि.मी. परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी दिनांक ०१/०५/१९८५ रोजी पासून ‘‘दहिसर पोलीस ठाणे’’ हे स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून कार्यरत झाले.