×

History


-

बोरीवली पोलीस ठाणे

बोरीवली पोलीस ठाणेची इमारत बोरिवली रेल्वे स्थानक, बोरिवली (पश्चिम), मुंबई समोरच्या एस.व्ही. रोड येथे सन १९६० मध्ये तयार करण्यात आली आहे. बोरीवली पोलीस स्टेशन बी.एम.सी. आरक्षण भूखंड एफ.पी.पी. क्रमांक ४४३-४४५, टी.पी.एस. ३ मधील 'आर' वार्ड, बोरिवली गाव येथे आहे. बोरिवली पोलीस ठाण्याचे क्षेत्र अंदाजे २८ कि.मी.२ आहे.

बोरीवली पोलीस ठाणेच्या हद्दीत हिंदू - २,९७,००० - ९०%, मुस्लिम - ६,६०० - २%, बौद्ध - ३,३०० - १%, इतर मिक्स कॉम्यूनिटी अशी अंदाजे ३ ते ३.५ लाख लोकसंख्या आहे. बोरीवली पोलीस स्टेशन चार बीट चौकीमध्ये विभागली गेली आहे. बी.एम.सी. शाळेच्या ठिकाणी स्थापन करण्यापूर्वी बोरिवली पोलिस स्टेशनची मूळ इमारत मुख्य कस्तूरबा रोड आणि कार्टर रोड क्रमांक १, बोरिवली (पूर्व), मुंबई येथे २६ जून १९८६ रोजी स्थित होती.