Welfare Activities
पोलीस अंमलदारांना रेनकोट चे वाटप
टिळकनगर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदारांना रेनकोट चे वाटप पावसाळी वातावरणात पोलीस अमंलदार हे रस्त्यावरती कर्तव्य बजावत असताना त्यांना पावसाळी रेनकोट ची अत्यंत निकड भासत असते. अनेकजण आपआपल्या परीने वेगवेगळया रंगाचे, डिसाईनचे रेनकोट विकत घेउन युनिफाॅर्म वर घालतात परंतु त्यामुळे मुंबई पोलीसांची ओळख दिसुन येत नाही. त्याबाबत विचार करून सर्व अमंलदारांना एक सारखा व मुंबई पोलीसांचे नाव व लोगो असणारे रेनकोट देणेबाबत विचार करून टिळकनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री षषिकांत पवार यांनी लायन्स क्लब, मुंबई अपटाउन यांची मदत घेउन 75 रेनकोट तयार करून घेउन दिनांक.05/07/2025 रोजी त्याचे वाटप टिळकनगर चे पोलीस अंमलदारांना करण्यात आले.