Good Work
०५-जुलै-२०२५
बीकेसी पोलिस कर्मचाऱ्यांचे चांगले काम
बी.के.सी. पोलीस ठाणे हद्दीत इसम नामे प्रीतम राजेंद्र शिंदे रा. ठी. तीन बावडी, घनसोली, नवी मुंबई हे चालक म्हणून काम करत असून ते कामाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया, बीकेसी, बांद्रा पूर्व, मुंबई या ठिकाणी आले होते. सदर ठिकाणी त्यांच्या गळ्यातील सोन्याची एक तोळ्याची चैन तुटल्याने ती त्यांनी खिशात ठेवली. त्यानंतर सदरची चैन गहाळ झाल्याने ते पोलीस ठाण्यास तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी प्रथम चौकशी पथकातील पोलीस अंमलदार चौरे व पोह हवालदार मोरे यांनी घटनास्थळी जाऊन सदर इसमाची चैन शोधून परत देण्यात आलेली आहे.