×

History


- २०१०

आर.सी.एफ.पेालीस ठाणे

आर.सी.एफ. पेालीस ठाणेची स्थापना दिनांक २६ जानेवारी १९८७ रोजी झालेली असून आर.सी.एफ. पोलीस ठाणेचे एकुण क्षेत्रफळ २० चौरस किलोमिटर आहे. पोलीस ठाणेची चतुर्सीमा पाहता उत्तरेस डॉ. सी. जी. गिडवाणी रोड, चेंबूर कॅम्प, मुंबई; दक्षिणेस बॉम्बे पोर्ट ट्रस्टची पिरपाव जेटी, एच. पी. सी. एल. कंपनीची जेटी, टाटा जेटी, टाटा कोयला जेटी, माहुलगाव जेटी व बी. ए. आर. सी. चा डोंगराळ भाग, पश्चिमेस आर. सी. एफ. कंपनी व प्रशासकीय कार्यालयाची प्रियदर्शनी इमारत, पुर्वेस बी.ए.आर.सी. भिंतीलगत सहयाद्री नगर (अ)/(ब), ओम गणेश नगर, अशोक नगर, भारत नगर, हशु अडवाणी नगर, विष्णु नगर, प्रकाश नगर, प्रयाग नगर झोपडपट्टीचा डोंगराळ भाग आहे. सदर पोलीस ठाणेच्या हद्दीतील लोकसंख्या सुमारे ४ लाखाच्या वर आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टिलायझर्स लि., चेंबूर, मुंबई या आस्थापनेने त्यांच्या मालकीचा दिलेला सिटी सर्वे नबंर- १२ बी/१३ बी, सि.टी.एस. क्रमांक- २१३, २१५ व २१६ प्लॉटवर (एकुण-३०,६००/- चौरस फुटाचा भुखंड) नियोजित आर.सी.एफ. पोलीस ठाणे इमारतीकरीता मासिक नाममात्र एक रुपया भाडेतत्वावर दिली आहे. आर.सी.एफ. पोलीस ठाणेची इमारत उभी असलेला भुखंड हा एकुण-३०,६००/- चौरस फुटाचा असुन त्यापैकी २२,५०० चौरस फुट भुखंडावर पोलीस ठाणेच्या इमारतीचे बांधकाम झालेले असून ८,१०० चौरस फुटाचा भुंखड शिल्लक आहे.