×

इतिहास


- १८९०

नागपाडा पोलीस ठाणे

नागपाडा पोलीस ठाण्याची स्थापना १८९० रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - नागपाडा पोलिस स्टेशन, सौफिया जुबेर रोड, नागपाडा, मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ७ लाख लोकसंख्या ७ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - शुक्लाजी चौक बिट चौकी, क्लेअर रोड बिट चौकी, ५वी गल्ली कामाठीपुरा बिट चौकी, मुंबई सेंट्रल बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वायरलेस वर्कशॉप, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग, मुंबई सेंट्रल एस.टी. डेपो, ताडदेव बेस्ट डेपो, सरकारी औषध भंडार, सिटी सेंटर मॉल, रिलायन्स मॉल चा समावेश होतो. जगजीवनराम रुग्णालय, नायर दंत रुग्णालय, नेत्रा रुग्णालय, कामाठीपुरा प्रसूती रुग्णालय, गुप्त रोग रुग्णालय, नागपाडा पोलीस रुग्णालय हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करतात, तर परिसरात जोशी नर्सिंग होम, डॉ. शेख नर्सिंग होम, बॉम्बे प्रसूती नर्सिंग होम, दौड नर्सिंग होम, नागोरी नर्सिंग होम, सेंट्रल नर्सिंग होम, फौजिया रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, मुंबई सेंट्रल एसटी आणि बेस्ट डेपो, ताडदेव संकुल बेस्ट डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. नागपाडा पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२३०९२२९३, २३००१८०५, २३०७८१०९

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२१९