×

History


-

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे स्वातंत्र्यपुर्व काळात सन १९२७ मध्ये अस्तित्वात आले आहे. सदर विभागातील थोर कामगार नेते कै. नामदेव मल्हारराव जोशी यांचे नाव या पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे. सुमारे ४.५० चौरस कि.मी. चे विस्तिर्ण क्षेत्रफळ आहे.

या पोलीस ठाणे हद्दीत प्रामुख्याने कामगार वर्गातील लोकांचा समावेश आहे. धार्मिक वर्गवारी नुसार सुमारे ९५% हिंदु यामध्ये बौध व नवबौध्द आणि इतर मागासवर्गीय, ३% मुस्लीम, १% ख्रिश्चन, तर १% पारसी धर्माच्या लोकांचा समावेश आहे. पुर्वी या पोलीस ठाणे हद्दीत अनेक मिल (कापड गिरण्या) अस्तित्वात होत्या. पंरतू कालांतराने सर्व मिल बंद पडल्या आहेत.

सदर बंद झालेल्या गिरणीच्या जागेवर मोठया प्रमाणात नविन औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात आले. त्यामध्ये शॉपींग मॉल, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, तसेच वित्तीय बॅकांची मुख्यालये तसेच अति संवेदनशिल असलेले ईस्त्रालय वकालतीचे कार्यालय आलेले आहे. त्याचप्रमाणे आय टी क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालये व कार्यालये अस्तित्वात आलेली आहेत. त्यामुळे पोलीस ठाणे हद्दीत एक वेगळे आय टी हब तयार झालेले आहे. त्याचप्रमाणे सदर गिरण्यांच्या जागेवर तयार झालेल्या जागेत जास्तीत जास्त हिंदी, मराठी न्यूज चॅनेल्स व इतर चॅनेल्सची कार्यालये या पोलीस ठाणे हद्दीत आहेत.

पोलीस ठाणे हद्दीत सेंट रिजस सारखे पंच तारांकित हॉटेल असल्याने हद्दीत परदेशी नागरीकांचे आगमन, वावर वाढला आहे. सर्वसाधारण मोठया प्रमाणावर आय टी क्षेत्र व इतर औद्योगिक इंडस्ट्रीज् असल्याने पोलीस ठाणे विभागात मोठया प्रमाणावर कामगारांची ये-जा होत आहे. त्यामुळे पोलीस ठाणे हद्दीत येत असलेली रेल्वे स्थानके लोअर परेल, करी रोड, एलफिस्टन, तसेच चिचंपोकळी यामध्ये सकाळच्या कार्यालयीन कामकाज अथवा कामावर येण्याच्या वेळी सर्वसाधारण लोकल मधुन एक ते दिड हजार लोक प्रत्येक ३ मिनीटाला उतरत असतात. त्यामुळे सदर विभागात वाहतुकीच्या कोंडीसारखी समस्या निर्माण होत आहे. तसेच वेगवेगळया कंपन्यांची कार्यालये, मॉल्स तयार झाल्याने मोठया प्रमाणावर खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.