History
- २०१५
मुंबई सागरी २ पोलीस ठाणे
मुंबई शहरामध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्र मार्गे होणारा संभाव्य दहशतवादी हल्ला टाळण्याकरीता आणि मुंबई शहराच्या सागरी सुरक्षिततेकरीता शासन संदर्भ क्र. टी. टी. सी. ३०१३ / प्र. क्र. १३२/ पोल-३ /गृहविभाग, दिनांक १६/११/२०१३ (महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ) अन्वये मुंबई सागरी पोलीस ठाणे - २ ची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सदर अधिसुचनेद्वारे मुंबई सागरी पोलीस ठाणे ची टी. आय. एफ. आर. ते गोराई खाडी पर्यंत सागरी हद्द ठेवण्यात आलेली आहे. सदर हद्द विभागून मुंबई सागरी पोलीस ठाणे-१ करिता टी.आय.एफ.आर. ते बांद्रा सी-लिंकचे उत्तरेकडील टोक आणि फेज-२ अंतर्गत बांद्रा सिलिंकचे उत्तर टोक ते गोराई व पुढे पानदेव डोंगरापर्यंत हद्द देण्यात आली आहे. सदर दोन्ही पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र भूभाग विरहीत, ओहोटीच्या रेषेपासून समुद्रामध्ये १२ नॉटीकल मैलपर्यंत असून त्यामध्ये कोणत्याही मानवी वस्तीचा सहभाग नाही.