×

History


- २००७

मुंबई सागरी १ पोलीस ठाणे

शासन निर्णय गृहविभाग, क्र. अेपीओ-३६०५/प्र.क्र- ३(ब) पोल, दिनांक १७/०२/२००६ नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्या अधिनस्त सागरी किनाऱ्याची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याकरीता महाराष्ट्रात ११ सागरी किनारा पोलीस ठाणे व बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय यांचे अधिनस्त १ पोलीस ठाणे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपरोक्त शासन निर्णयानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त वर्सोवा सागरी किनारा पोलीस ठाणे व ६ सागरी चौक्यांबाबत दिनांक १४/०६/२००६ च्या मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. म्हणुन संपुर्ण मुंबईच्या ११४ किलो मिटर सागरी किनारपट्टीसाठी १ पोलीस ठाणेस मान्यता देवून मनुष्य बळासाठी विविध संवर्गातील ९० पदे मंजूर करण्यात आली आहेत.

उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक २२/११/२००७ रोजीपासुन यलोगेट पोलीस ठाणेचे बाजुच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वर्सोवा सागरी पोलीस ठाणे स्वतंत्ररित्या मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यालयीन आदेश क्र. कक्ष-२(१) /रवका /३४/२००७, दि. १६/११/२००७ प्रमाणे कार्यान्वित करण्यात आले.