×

History


-

खेरवाडी पोलीस ठाणे

सन १९६२ मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्याची स्थापना झाली असून त्यावेळी पोलीस ठाणे हे परिमंडळ - ४, माटुंगा, मुंबई व सहा. पोलीस आयुक्त, धारावी, मुंबई यांचे अधिनिस्त होते. सन १९६२ मध्ये बांद्रा (पूर्व) परिसरात निर्मलनगर व बीकेसी ही पोलीस ठाणे नव्हती. सन १९९५ मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन निर्मलनगर पोलीस ठाणे निर्माण करण्यात आलेले आहे. सन १९९० मध्ये खेरवाडी पोलीस ठाणे हे मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ८, मुंबई यांचे अधिपत्याखाली घेण्यात आले. सदर वेळी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ८, मुंबई यांचे कार्यालय पोलीस इमारतीचे दुसऱ्या मजल्यावर होते.

सन २००३ मध्ये पुन्हा खेरवाडी पोलीस ठाण्याचे विभाजन होवून बी.के.सी. पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. बी.के.सी. पोलीस ठाण्याचे निर्माण झाल्यानंतर मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ८ यांचे व मा. सहा पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग यांचे कार्यालय बी.के.सी. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे पहिल्या मजल्यावर स्थालांतरीत करण्यात आले.