×

इतिहास


- १९६३

गोरेगाव पोलीस ठाणे

गोरेगांव पोलीस ठाण्याची स्थापना १७ मार्च १९६३ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - गोरेगांव पोलीस ठाणे, सिनेमॅक्स सिनेमाच्या शेजारी, एस.व्ही.रोड, गोरेगांव पष्चिम मुंबई ४००१०४ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १० लाख लोकसंख्या ही १९४२.७ चौ.मि क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. गोरेगांव पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - मोतीलाल नगर नं. ०२ पोलीस चैकी, ग्रामपंचायत रोड पोलीस चैकी, जवाहर नगर रोड पोलीस चैकी, मोतीलाल नगर ०१ पोलीस चैकी.

गोरेगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सीटी सेंटर माॅल, गोरेगांव रेल्वे स्टेषन गोरेगांव रेल्वे स्टेषन, रजिस्ट्रेषन कार्यालय, एस.व्ही.रोड गोरेगांव पश्चिम, अदाणी कार्यालय, ‘‘पि’’ साऊथ वाॅर्ड, महानगर पालीका आणि पाण्याची टाकी, उन्नत नगर गोरेगांव पष्चिम यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे समावेश होतो. याशिवाय मनपा रुग्णालय, टोपीवाला आणि सिध्दार्थ शवविच्छेदन केंद्र, शास्त्री नगर गोरेगांव पष्चिम हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर एस.आर.व्ही. हाॅस्पीटल, जवाहर नगर, कापडीया हाॅस्पीटल, एम.जी.रोड, इनफीनीटी हाॅस्पीटल आणि लाईफलाईन हाॅस्पीटल इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत. धर्मस्थळांमध्ये श्री सिध्दीविनायक मंदिर आणि अंबाबाई मंदिर हे महत्त्वाचे आहे.

प्रवासासाठी गोरेगांव आणि राममंदिर रेल्वे स्थानक आणि गोरेगांव आणि ओषिवरा बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. गोरेगांव पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८७२१९००/२८७२३२५२

मोबाईल क्रमांक - ८९७६९५२१५१