History
- १९६५
धारावी पोलीस ठाणे
धारावी पोलीस ठाण्याची स्थापना १९६५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - धारावी पोलीस ठाणे, कृष्णन मेमन मार्ग, ९० फिट रोड, मुंबई ४०००१७ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १२-१३ लाख लोकसंख्या ५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. धारावी पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - धोबी घाट पोलीस चौकी, संत कक्कया मार्ग पोलीस चौकी, टि जंकशन पोलीस चौकी, संत रोहिदास मार्ग पोलीस चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ओ.एन.जी.सी., धारावी बस डेपो, सायन रेल्वे स्टेशन, धारावी मेट्रो स्टेशन, कुंभारवाडा, चमडा बाझार, निसर्ग उद्यान चा समावेश होतो. या परिसरात लाईफ केअर रुग्णालय, आयुष हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी शीव रेल्वे स्टेशन , माहिम रेल्वे स्टेशन आणि धारावी बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. धारावी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२४०७४३६८/२४०७३९८८
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९५०