×

इतिहास


- १९४६

दादर पोलीस ठाणे

दादर पोलीस ठाण्याची स्थापना १९४६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - दादर पोलिस स्टेशन, व्ही. एस. मतकर रोड, दादर पश्चिम, मुंबई - ४०००२८ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ६,००,००० लोकसंख्या ४.२५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. दादर पोलीस ठाणे ५ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - वरळी कोळीवाडा बिट चौकी, प्रभादेवी बिट चौकी, बंगाल केमिकल जंक्शन बिट चौकी, अल्ट्रा बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात श्री सिद्धिविनायक मंदिर, टाटा कम्युनिकेशन, कोस्ट गार्ड, परळ एसटी डेपो, दादर उदंचन केंद्र, वरळी किल्ला, प्रभादेवी चौपाटी चा समावेश होतो. बीएमसी महिला प्रसूतीगृह हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करतात, तर या परिसरात सिद्धांचल हॉस्पिटल, स्पोर्ट्स मेड हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी दादर रोड रेल्वे स्टेशन आणि परळ एसटी डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. दादर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२४२२७२२९

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२३३