×

History


- १९७८

चेंबूर पोलीस ठाणे

चेंबूर पोलीस ठाणे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील जुने पोलीस ठाणे असून पुर्वी ते चेंबूर कॅम्प येथे होते. चेंबूर पेालीस ठाणे हे सन - १९७८ सालापासून बसंत पार्कसमोर, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई येथे सी.टी. सर्व्हे क्र. ४१२ , ४१३ , ४१३ (१ ) व ४१४ अशा भुखंडावर वसलेले आहे. चेंबूर पोलीस ठाणे हे मुळचे ०७ बैठया खोल्यांचे होते. तसेच पोलीस ठाणे नजिक बिनतारी संदेश कार्यालय (पुर्वीचे चेंबूर विभाग कार्यालय) अधिकारी निवास अशी बैठी वास्तु आहे.

चेंबूर पोलीस ठाणे अंतर्गत स्वस्तीक पार्क पोलीस चौकी, चेंबूर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, चेंबूर कॅम्प पोलीस चौकी, कलेक्टर कॉलनी पोलीस चौकी ह्या एकूण ४ बिट आहेत.